राजकारण

अजित दादांनी दिलेला धोका भुजबळांच्या जिव्हारी, समर्थकांच्या मेळाव्यात भुजबळांचे ठळक संकेत

Ajit dada PAWAR s danger hurtling chagan bhujbal

वेगवान मराठी महाराष्ट्र -दि-18 डिसेंबर + छगन भुजबळ यांच्य मंत्रीमंडळातील समावेशा वरुण उठलेले वादळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा नवा इतिहास घडवण्याच्या दिशेने घोंघावत आहे काल नाशिक जिल्ह्यातील येवल्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी मोठे वकत्वय केले आहे, “पुन्हा एकदा नव्याने लढण्याचा” संदेश उपस्थित कार्यकर्त्यांना देत एक प्रकारे छगन भुजबळांनी नव्या राजकीय भुमीकेचे संकेतच दिले आहेत…नेमकं काय बोललेत छगन भुजबळ वाचा 👇

येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे ग्वाही दिली.

तसेच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला-लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंध ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही दिली.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्यासोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के.जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, एल.जी.कदम, अर्जुन कोकाटे, डॉ.श्रीकांत आवारे, दिपक लोणारी, राजश्री पहिलवान,सुरेखा नागरे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गणपत कांदळकर, विनायक भोरकडे, साहेबराव आहेर, विनोद जोशी, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, दत्ताकाका रायते, विलास गोरे, शिवाजी सुपणर, अशोक नागरे, संजय पगारे, सचिन कळमकर, कैलास सोनवणे, बालेश जाधव, डॉ.प्रवीण बुल्हे, तानाजी आंधळे, मलिक मेंबर, मतीन अन्सारी, पांडुरंग राऊत, सर्जेराव सावंत, डॉ.वैशाली पवार, अनिल सोनवणे, बबन शिंदे, अशोक संकलेचा, अल्केश कासलीवाल, सोहील मोमीन, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!