मराठावाडा मुक्तीसंग्राम चळवळीची साक्ष देणारी सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील इतिहास कालीन वास्तू.. अजूनही जशीच्या तशी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेले जरंडी गाव अजूनही मराठावाडा मुक्तीसंग्राम चळवळीची साक्ष देत आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मराठावाड्यावर निजामशाही राज्य करीत होती मराठावाडा हा हैद्राबाद येथील निजामाची सत्ता होती मात्र मराठावाडा मुक्तीसंग्राम चळवळीतील क्रांतीवीरांनी आपली निजामाविरोधात लढाई सुरू ठेवत अखेर १९४८ मध्ये हैदराबाद येथील निजामशाही संपवत मराठवाड्याला मुक्त केले यात अनेक क्रांतीवीरांचे प्राण गेले अजूनही याची इतिहासात नोंद आहे
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे १८७१ मध्ये निजामशाही काळात पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती याच चौकीमधून निजामशाहीचे रखवालदार मराठावाडा मुक्ती संग्राममधील क्रांतीवीरांच्या हालचालीवर नजर ठेवून होते, हैदराबाद येथील निजामाच्या तावडीतून मराठावाडा मुक्त करण्यासाठी गाव खेड्यातील सर्व क्रांतिकारक एकवट होते जरंडीत तर मराठावाडा मुक्त करण्यासाठीची चळवळ संपूर्ण मराठावाडामध्ये चर्चेत होती अजूनही जरंडी गावात निजामशाहीत बांधकाम झालेल्या इतिहासकाळीन वास्तूच्या पाऊलखुणा जसेच्या तशा आहेत निजामशाहित सण १८७१ मध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली होती ही वास्तू अजनुही जशीच्या तशी पाहायला मिळत आहे, यामधूनच निजामाचे पहेरेदार आपल्या हुकुमाची अंबलबजावनी करत असत १८७१ मध्ये बांधण्यात आलेल्या या ऐतिहासिक व इतिहासकालीन वास्तूच्या छतावरील कवळे सण १८७१मधील असून क्रांतीवीरांच्या लढ्यानंतर सण १९४८ मध्ये अखेर निजामाच्या तावडीतून मराठावाडा मुक्त झाला होता यात अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती
