
क्रिडा मंत्रालय भारत सरकारच्या खेलो इंडिया योजने अंतर्गत जिल्हास्तर खेलो इंडिया कबड्डी केंद्र,बीड –क्रीडा मार्गदर्शकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती होणार आहेत…
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड-केशव डि मुंडे – दि. 12 फेब्रुवारी 2025 ( जि मा का ) :- केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या योजने अंतर्गत देशातील विविध जिल्ह्यामध्ये 1000 खेलो इंडिया केंद्र पुढील 4 वर्षामध्ये निर्माण करण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत बीड जिल्ह्यास कबड्डी या खेळाचे केंद्र सुरु करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे
त्यानुसार जिल्हा क्रिडा संकुल, बीड येथे केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर योजनेचा उद्देश जिल्ह्यातील उत्कृष्ट 15 मुले व 15 मुली खेळाडूंची निवड करुन त्यांना तज्ञ प्रशिक्षकाद्वारे तंत्रशुध्द प्रशिक्षण देऊन प्रतिभावान खेळाडू तयार करणे हा आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीडला मंजूर झालेल्या खेलो इंडिया कबड्डी केंद्रावर प्रशिक्षण देण्यासाठी पुढील अर्हताप्राप्त प्रशिक्षकांची नियुक्ती मानधन तत्वावर करावयाची आहे.
प्रशिक्षक अर्हता:- 1) वयोगट 18 ते 45 वर्षे यामध्ये अतिउच्च कामगिरी / गुणवत्ता / एशियन गेम्स /
2 ) जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त व प्रशिक्षणाच्या अनुभवासह
3) जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चैंपीयनशीप / साऊथ एशियन स्पर्धा / संबंधित खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त खेळाडू – प्रशिक्षणाच्या अनुभवासह,
4) राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार्थी प्रशिक्षणाच्या अनुभवासह,
5) एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेवल कोर्सेस किंवा बी.पी.एड्. एम.पी.एड. सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदक प्राप्त – प्रशिक्षणाच्या अनुभवासह,
6) राज्यस्तर खेळाडू बी.पी.एड., एम.पी.एड. सह कमीत
कमीत कमी 10 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव. प्रशिक्षकांची नियुक्ती ही तात्पुरती स्वरुपाची निवळ मानधन तत्त्वावरील आहे. प्रशिक्षक मानधन हे प्रति महिना 15,000/- ते रुपये 25,000/- एवढ्या स्वरुपात असेल.
प्रशिक्षकांचा परफॉर्मन्स आढळून न आल्यास त्यास जिल्हास्तर खेलो इंडिया केंद्र नियंत्रण व देखरेख समिती, बीड कधीही प्रशिक्षक पदावरुन दूर करेल.
वरील अर्हता धारक प्रशिक्षकांनी कृपया आपले अर्ज कार्यालयीन वेळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे दिनांक 21/02/2025 रोजी पर्यंत सादर करावेत.
अधिक माहिती करीता रेवननाथ शेलार यांना 9075476791 या भ्रमनध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.