पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या परळी तालुक्यातील व्यक्ती वर गुन्हा दाखल
A case has been registered at Parli Rural Police Station against a husband who falsely reported his wife missing.

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे – दिनांक 16 फेब्रुवारी 2026 परळी वैजनाथ
पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी माहिती देऊन पोलीसांना परेशान करणाऱ्या हेळंब येथील इसमावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल…
पो.कॉ. 1879 महादेव बबन केदार नेमणूक पोलीस ठाणे परळी ग्रामीण यांनी दि.12/02/2026 रोजी सरकारतर्फे फिर्यादी होऊन पो.स्टे.ला फिर्याद दिली की,
ते दिनांक 12/02/2026 रोजी 08:00 ते 20:00 वा. पावेतो डायल 112 या आपत्कालीन सुविधीकरिता कर्तव्यावर असताना MDT वर मो.क्र.9373225071 वरुन कॉल आला व त्यात इसम नामे गोविंद गजेंद्र भारती रा. हेळंब ता. परळी वै जिल्हा बीड याने त्याची पत्नी नामे रोहीणी ही बेपत्ता झाली आहे अशी माहिती दिली होती
म्हणुन त्यावेळी सोबत पोकों 762 तुळशिराम मानेजी परतवाड यांचेसह हेंळंब येथे जाऊन नमुद ईसमाची भेट घेतली असता नमुद ईसम दारु पिलेला आढळुन आला
त्याने दिलेल्या माहितीची त्यांनी खात्री केली असता नमुद इसमच्या दारु पिण्याच्या सवईला कंटाळुन त्याची पत्नी ही तिच्या माहेरी राहत असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली
तसेच कॉलरची पत्नी माहेरी असल्याचे गोविंद भारती यास माहित असल्याची त्यांची खात्री झाली.
तसेच दि.11/02/2026 रोजी देखील नमुद कॉलरने डायल 112 या आपत्कालीन सुविधेवर संपर्क करुन त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती व पोह 1534 पी.व्ही.वाले यांनी नमुद कॉलरची पत्नी बेपत्ता झाली नसल्याची खात्री करुन कॉलर यास खोट्या माहितीचे कॉल न करण्याची तोंडी समज दिली होती.
नमुद ईसमास पोकों केदार व पोकों परतवाड यांनी ताब्यात घेऊन तो दारुच्या अंमलाखाली आहे किंवा कसे याबाबत त्याची उपजिल्हा रुग्णालय परळी वै येथे वैद्यकिय तपासणी केली आहे.
शासनाने डायल 112 ही आपत्कालीन सुविधा नागरीकांच्या आपत्कालीन परिस्थीतीत मदत पोहचविण्यासाठी सुरु केलेली असतानाही
ईसम नामे गोविंद गजेंद्र भारती रा. हेळंब ता. परळी वै जिल्हा बीड याने पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशाने
वारंवार सदर सुविधेवर कॉल करुन पोलीसांना खोटी माहिती दिली म्हणुन नमुद ईसमाविरुध्द पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे दिनांक 12/02/2026 रोजी गु.र.नं. 69/2026 कलम 212,223 भारतीय न्याय संहीता सह कलम 85(1) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागरीकांना आव्हान करण्यात येते की, डायल 112 ही सुविधा आपत्कालीन सुविधा असुन यावर कॉल करुन खोटी माहिती दिल्यास अथवा विनाकारण वारंवार कॉल केल्यास अशा इसमाविरुध्द कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








