परळीतील चंदन तस्कर पुष्पा ची टोळी गजा आड
Action taken against a large gang of sandalwood thieves in Parli

!! 03/01/2026 परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत चंदन तस्करीवर मोठी कारवाई.!!
!!! 8.21 लाखांचा मुद्देमाल जप्त; !!!
!!! 7 आरोपी ताब्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाची कारवाई.!!!
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी वैजनाथ – दि. 05.01.2026 रोजी सायंकाळी 19.00 वाजताचे सुमारास श्री. ऋषिकेश शिंदे सहायक पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, मौजे धर्मापुरी ते पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या गायराण जमिनीत काही इसम प्रतिबंधित चंदनाची बेकायदेशीर खरेदी-विक्री व वाहतूक करत आहेत.
सदर माहितीच्या आधारे सहा. पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेश शिंदे यांनी त्यांचे पथक तात्काळ रवाना करुन रात्री 21.00 वाजताचे सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी अचानक छापा टाकला.
छाप्यात पुढील आरोपी विनापरवाना बेकायदेशीररित्या चंदनाची तस्करी करताना मिळून आले :1. पप्पु बाबुराव सूर्यवंशी (वय 40) 2. राहुल पप्पु सूर्यवंशी (वय 23) 3. तेजस कल्लप्पा कोळीबे (वय 25) (रा. अशोक नगर, परळी वै., जि. बीड) 4. नितीन सटवा जाधव (वय 22), रा. हनुमान नगर, परळी वै., जि. बीड
5. अविनाश व्यंकट जाधव (वय 23) 6. व्यंकट रामचंद्र जाधव (वय 45) (दोन्ही रा. फुलेनगर, उदगीर, जि. लातूर) 7. भारत निवृत्ती गायकवाड (वय 40), रा. नाकलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
104 किलो (किंमत ₹3,00,000/-, चार अंदाजे ₹61,000/-, आरोपींच्या ताब्यातुन पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंदन लाकूड ₹2,60,000/-), चंदन साल 39 किलो (किमत ₹39,000/-),
टाटा इंडिगो चारचाकी कार दुचाकी वाहने अंदाजे ₹1,60,000/-, एक विनानंबर दुचाकी ₹20,000/-, 7 मोबाईल फोन लोखंडी तराजू व वाकस ₹1,000/- असा एकुण मुद्देमाल किंमत ₹ 8,21,000/- प्रमाणे पंचर्चासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार 2169 सतेश कांगणे यांचे फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे गुन्हा रजि. क्रमांक 12/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 317(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक असद शेख (अंबाजोगई ग्रामीण), पोलीस उपनिरीक्षक निमोने (परळी ग्रामीण), पोह. बासर, बिक्कड (अंबा. ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोह. सतेश कांगणे, सफौ. सोडगीर, पोअं/ उत्तरेश्वर केदार, खंदारे यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








