
दिनांक २२/०५/२०२५ वेगवान मराठी केशव डी मुंडे बीड-जिल्ह्यात अनेक वर्षांपासून तळ ठोकून बसलेल्या खाकीतल्या 606 पोलीस कर्मचाऱ्यांसह निरिक्षकांच्या बदल्यांचा आदेश …
खालील निकष लागलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे बस्तान उठले ! गपगुमाने भरावे लागणार सामान आणि धरावा लागणार बाहेरचा रस्ता…

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ व त्यामधील (सुधारणा) २०१५ अन्वये तसेच शासन निर्णय दिनांक टीमारएन-११०/प्र.क्र. ४८८/पोल ५ ब मुंबई दिनांक २३/०४/२०१० मधील तरतुदीनुसार बीड पोलीस दलातील सन २०२५ मध्ये सर्वसाधारण बदल्या च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आस्थापना मंडळ गठीत करण्यांत आलेले आहे.
सदरचे आस्थापना मंडळाची दिनांक २७/०३/२०२५ रोजी वार्षीक बदलीपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यांत आलेली होती.
सदरचे बैठकीमध्ये शासन निर्णयातील सर्व तरतुदीचे बारकाईने अवलोकन होवून वार्षीक सर्वसाधारण बदली प्रक्रिया करीत बदलीपात्र पोलीस अंमलदार यांचे साठी खालील प्रमाणे निकष निश्चीत करण्यांत आलेले होते.
१) सध्याचे नेमणुकीचे ठिकाणी दिनांक ३१/०५/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी ज्यांची खंडीत अखंडीत (संलग्न कामकाज नेमणूक धरुन) ०५ वर्षे सेवा पुर्ण झाली आहे,
ते अमंलदार बदलीस पात्र ठरणार आहेत. २) तालुक्यामध्ये एकापेक्षा जास्त पोलीस ठाणे/ शाखा/ अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय/ उपविभागीय पोलीस
अधिकारी कार्यालय असल्यास त्या तालुक्यामधील कमाल कालावधी सर्व संवर्गामोल खंडीत अथवा अखंडीत सेवा
धरुन १२ वर्षे पूर्ण झाला असल्यास बदली करण्यात येईल. ३) स्वग्राम तालुकामध्ये नेमणूक असल्यास (पोलीस ठाणे) सदरील अंमलदार यांची बदली करण्यांत येईल.
वरील निकषांची पूर्तता करीत असलेल्या पोलीस अंमलदार यांनी त्यांचे विनंती अर्ज सादर करणे बाबत सर्व पोलीस अंमलदार यांना प्रभारी अधिकारी यांचे मार्फतीने कळविण्यांत आलेले होते.
त्या अनुषंगाने आस्थापना मंडळाने प्राप्त अर्ज, वरील निकषा आधारे बदलीपात्र अंमलदार यांचा आढावा घेण्यांत आला.
त्यानंतर बदलीपात्र पोलीस अंमलदार यांचे दिनांक १४/०५/२०२५ ते दिनांक १६/०५/२०२५ या कालावधीत पोलीस अधीक्षक, कार्यालय बीड येथे समुपदेशनाव्दारे त्यांचे म्हणणे समक्ष ऐकण्यांत आले.
वरील प्रमाणे निश्चीत करण्यांत आलेल्या निकषाप्रमाणे चालक संवर्ग वगळता खालील प्रमाणे पोलीस अंमलदार बदलीपात्र होते.
विहीत पाच वर्षे कालावधी पूर्ण :- २२९
एकाच तालुका मध्ये १२ वर्षे पूर्ण:- २१६
स्वग्राम तालुका मध्ये नेमणूक :- १६१
विविध पोलीस ठाणेस मंजुर, हजर, रिक्त संख्याबळ, विविध पोलीस ठाणे येथील गुन्हयांची संख्यात्मक माहिती, कायदा व सुव्यवस्था इ. बाबी विचारात घेवून
बदलीपात्र पोलीस अंमलदार यांचे पैकी कोणत्या पोलीस ठाणे / शाखा येथे कोणत्या पदाचे किती मनुष्यबळ आवश्यक आहे याबाबतचा आढावा जिल्हास्तरीय आस्थापना मंडळाने घेतला.
त्यानुसार संबंधित पोस्टे/ शाखा येथे किती पदे रिक्त आहेत याबाबत पोलीस अंमलदार यांना त्यांचे समुदपदेशानाव्दारे रिक्त पदांचे ठिकाणी बदली बाबत पसंतीक्रम समक्ष विचारणा करण्यांत आले.
वरील प्रमाणे पोलीस अंमलदार यांचे बदल्या करण्यांत येत असताना आस्थापना मंडळाचे असे निर्दशनास आलेले आहे की,
बीड तालुका अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन व शाखा येथून एकूण ६०६ पोलीस अंमलदार यांचे पैकी ३६३ पोलीस अंमलदार हे बीड तालुका मधून बदलीपात्र होते.
सदरचे सर्वच बदलीपात्र पोलीस अंमलदार यांची बीड तालुका बाहेर बदली केल्यास बीड तालुका मध्ये मोठया प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासून ऐनवेळी पोलीस अंमलदार यांचे मनुष्यबळाचा समतोल ढासाळण्याची शक्यता होती.
सदर बाबीचा आस्थापना मंडळाने सर्वकष विचार करुन ज्या पोलीस अंमलदार यांचे गंभीर वैद्यकीय अडचण, प्रशासकीय निकड,
खेळाडू, तांत्रिक तज्ञ तसेच गंभीर कौटुंबिक, वैद्यकीय अडचण असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांना प्राधान्य देवून बीड शहरात नेमणूक देणे बाबत निर्णय घेण्यांत आला.
त्याप्रमाणे खालील प्रमाणे पोलीस अंमलदार यांना निश्चीत करण्यांत आलेले निकष शिथील करुन नेमणूक देण्यांत आलेली आहे.
प्रशासकीय कारणास्तव :-४९
वैद्यकीय कारणास्तवः १३
खेळाडू (मेडल प्राप्त):-०१
तांत्रिक तज्ञ :- ०४
त्याचबरोबर मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक पोमर्स/६/१० बदल्या-परिपत्रक १६२/२०१३ दिनांक २१/०५/२०१३ मधील तरतुदीनुसार पोलीस अंमलदार यांचे सेवानिवृत्तीस तीन वर्षे बाकी असल्यास व त्यांची विनंती असल्यास त्यांच्या स्वतःच्या तालुक्यात नेमणूक देण्यांत आलेली आहे.
तसेच ज्या पोलीस अंमलदार यांचों सेवानिवृत्ती अत्यंत नजीकच्या काळात (एक वर्षापेक्षा कमी) अशा ३० पोलीस अंमलदार यांना त्यांची बदली न करता त्यांचे मूळ नेमणूकीचे ठिकाणी कायम ठेवण्यांत आलेले आहे.
तसेच प्रशासकीय निफड, संबधित पोलीस अंमलदार यांची वैद्यकीय, शैक्षणीक, कौटुंबिक निकड विचारात घेवून एकूण १५ पोलीस अंमलदार यांना एक वर्षे मुदतवाढ देण्यांत आलेली आहे.
एकंदीत वरील प्रमाणे पोलीस अंमलदार यांचे वार्षीक सर्वसाधारण बदली पात्र पोलीस अंमलदार यांची बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे, निःपक्षपातीपणे व प्रशासकीय निकड लक्षात घेवून पोलीस अंमलदार यांचे बदल्या करण्यांत आलेले असून सदरचे ६०६ पोलीस अंमलदार यांचे बदल्याचे आदेश दिनांक २१/०५/२०२५ रोजी निर्गतिम करण्यांत आलेले आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








