पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीकडून अपघात ~ तरूण जागीच ठार

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता, 3 पुणे येथिल कल्याणीनगर प्रकरण गाजत असतांना यात भर पडली ती शिरूर तालुक्यात एक अल्पवयीन मुलीने चक्क मालवाहू पिकअप चालवत एका दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू होऊन एक तरूण गंभीर जखमी आहे• एक विशेष म्हणजे अल्पवयीन मुलीचे वडील पोलीस पाटील संतोष लेंडे हे देखील या पिकअप मध्ये त्या गाडीत होते•
राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी चूक केली का? पत्नीही निवडु शकतं नाही पहा वेगवान मराठी स्पेशल
पुणे येथे अल्पवयीन मूलाने गाडी चालवत तरूण तरूणीला उडवले त्यात त्यांचा मृत्यू झाला हे प्रकरण जूने होत नाही तर शिरूर तालूक्यातील आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे यांची एमएच 12 एस एफ 3439 या पिकअप व्हॅन यांची अल्पवयीन मुलगी चालवत असतांना वडगाव बांडे रस्त्याने अरूण मेमाणे आणि मच्छिंद्र बांडे हे आपल्या दुचाकीवर एम एच 12 व्ही आर 2072 जात असतांना या दुचाकिला धडक दिली•
आईचा व पिलाचा विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून दुर्दैवी मृत्यू
यात अरूण मेमाणे याचा रूग्णालयात मृत्यू झाला आणि बांडे हा जखमी झाला • आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे व त्यांची अल्पवयीन मुलगी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गून्हा दाखल झाला आहे यात पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे पुढील तपास करत आहे•
महाराष्ट्रात महायुतील इतक्या तर मविआ ला एवढ्या जागा मिळणार, एक्झिट पोल जाहिर
