राजकारण

बीड मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव, जरांगे फॅक्टरची चर्चा

विजय चौधरी-छत्रपती संभाजीनगर

शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या बीडच्या निकालाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. निकालाच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये श्रील आणि सस्पेन्स अनुभवायला मिळालेल्या या निवडणुकीत कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे आघाडी घ्यायचे. शेवटच्या काही फेऱ्या उरल्या तेव्हा २५ हजारांची लीड असलेल्या पंकजा मुंडे मागे पडल्या आणि बजरंग सोनवणे यांनी अखेर ७०००मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.

या निवडणुकीत राज्यासह देशाच लक्ष बीड मतदारसंघाकडे होते त्याच कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिण एकत्र येणं आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण 2004 वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली होती. २०१९ मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे खासदार झाल्या.

२०१४ च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास ७ लाखांची आघाडी होती. पण २०१९मध्ये १ लाख ६८ हजारांची आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

२०१९ मध्ये प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं ९० हजारावर मतं घेतली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीतधनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससाठी शक्ती पणाला लावली होती. त्यामुळं मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना दिसून आला, तर यावेळी राजकीय दृश्य वेगळे आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर गेल्यानं पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकत्र आले आहेत. यावेळी धनंजय मुंडे स्वतः बहिणीसाठी प्रचार करताना दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!