किसान सन्मान योजनेतुन १ लाखावर शेतकरी बाहेर PM-Kisan Samman Nidhi
किसान सन्मान योजनेतुन १ लाखावर शेतकरी बाहेर

वेगवान मराठी / अरूण थोरे
नाशिक, ता. 6 जून 24 – पि. एम. किसान योजनेचं निती आयोगाकडुन मुल्यांकन सुरु असताना, आता या योजने बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या योजनेतून १ लाख १६ हजार शेतकरी स्वतः हुण बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस कोसळणार
केंद्रीय कृषिमंत्रालयान याबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुन २०२३ ते मे २०२४ दरम्यान सुमारे १ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी स्वतः हुण या योजनेतून बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर या योजनेत बदल होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. आता त्यात काय बदल होतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. सध्या या योजनेतून दर वर्षाला सहा हजार रुपये शेतकर्यांचा खात्यात जमा होतात. या योजनेत नेमके कोणते बदल होणार याबाबत मात्र स्पष्टता आली नसून केंद्रातील सत्ता स्थापने नंतर चित्र स्पष्ट होईल.
या योजनेतून शेतकरी स्वतःहून का बाहेर पडले याचे कारण मात्र अद्याप कळु शकले नाही शेतकरी सन्मान योजनेबाबत अनेक ठिकाणच्या जाहीर सभामध्ये भाजपाकडून शेतकरी प्रश्नांवर ढाल म्हणून उपयोग करण्यात आला होता.
