छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६४ रुपयांची कपाशीच्या बियाण्यांची बॅग तब्बल २५०० हजार रुपयाला शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्क्याच्या मार अर्थपूर्ण घडामोडीमुळे कृषी विभाग गार

वेगवान मराठी/विजय चौधरी
छत्रपती संभाजीनगर:गंगापूर तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपांच्या पेरणीला वेग आला आहे तालुक्यातील लासूर स्टेशन येथे तर कृषी सेवा केंद्र चालकांनी कहर केला असून ८६४ रुपयांची कपाशीच्या बियाण्यांची बॅग तब्बल २५०० हजार रुपयाला विक्री होत असून कृषी दुकानावर नियंत्रण ठेवणारा कृषी विभाग मात्र अर्थपूर्ण घडामोडीमुळे कुंभकर्णी झोपेत असल्याचे सोंग करत आहे.दरम्यान गंगापूर शहरात चार दिवसापूर्वी बोगस बियाणे विक्री करणारी टोळी पकडली होती त्यात लासूर स्टेशन येथील एक कृषी दुकानदार होता ते कमी पडले कि काय म्हणुन नाथ सिडसचे संकेत हे वाण, यु. एस. सिडसची ७०६७, कबड्डी, पंगा, राशी ६५९, हे कपाशीचे बियाण्यांचे वाणांची किंमत सरकारनेप्रतिबॅग ८६४ रुपये ठरवून दिली आहे मात्र लासूर स्टेशन येथील कृषी सेवा केंद्र चालक सर्रास २५०० रुपयाला प्रतिबॅग विकत आहे मात्र कृषी विभाग अर्थपूर्ण व्यवहार करत असून दुकानदारांना मोकळे सोडत आहे मात्रयात बळीराजाचे आर्थिक नुकसान होत आहे
आ. प्रशांत बंब
गंगापूर खुलताबाद यांदोन्ही तालुक्यांतील सर्व कृषि सेवादुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यांतील तालुका कृषि अधिकारी व त्यांचे अधिनस्त कृषि सेवकांना मुख्यालयी राहणेबाबत बंधनकारक करावे. नसता याप्रकरणी होत असलेले गैरप्रकार बंद न झाल्यास येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी चर्चा उपस्थिती करुन त्याची नोंद घेण्याचा ईशारा देखील आ. प्रशांत बंब यांनी दिला
कृषी विभागाला जिल्हाधिकारी भारी, अनेक कृषी दुकानाची केली दफतर तपासणी
छत्रपती संभाजीनगर शहरातील कृषी सेवा दुकानाची जिल्हाधिकारी दिलीप
दुकाने तसेच त्यांच्याकडील विविध नोंदींची तपासणी केली. बियाणे खरेदीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली दरम्यान कृषी विभागाने दुकानदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक दुकानावर कृषिसहाय्यक नेमलेले आहेत मात्र या ना त्या कारणाने हे कृषिसहायक खरेदीच्या गर्दीच्यावेळी दुकानातून काढता पाय घेतात नेमका हा मोका साधून दुकानदार ८६४ रुपयांची कपाशीच्या बियाण्यांची बॅग तब्बल २५०० हजार रुपयाला विक्री करत आहे मात्र कृषी विभाग ज्या दुकानात चढ्या भावाने बियाणे विक्री होते ते दुकान सोडून दुसऱ्याच दुकानाची दफ्तर चेकिंग करून चौकीशीचा फार्श पूर्ण करून कारवाईचा आव आणत आहेत
