छत्रपती संभाजी नगर

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे नऊ जनावरांची पोलीसांनी केली सुटका

वेगवान मराठी/ कार्तिक राजगुरु कन्नड/ छत्रपती संभाजीनगर

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे गुरुवारी पहाटे ५:३० वाजता करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायात पोलिसांनी नऊ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून एक वाहनासह जनावरे असा एकूण ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताड पिंपळगाव- देवगाव रंगारी रस्त्यावरून पिकअप वाहनातून (एमएमच २०- डिई २८७५) तीन गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर गुरुवारी पहाटे पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक व स्थानिक पोलिसांनी देवगाव रंगारी येथे सापळा रचला. येथे पिकअप वाहन येताच त्याला थांबविले असता त्यात गोवंश जातीचे तीन, तर जवळील एका खळ्यावर ६ अशी ९ जनावरे आढळून आली. यावेळी पोलिसांनी वाहन चालक सनी दिवेकर, जनावरांचा मालक हुसैन कुरैशी दोघे (रा. देवगाव रंगारी) व एक अनोळखी व्यक्तीविरोधात देवगाव रंगारी ठाण्यात गुन्हा दाखल करून जनावरांची पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी केली. त्यानंतर त्यांची रवानगी जैतखेडा येथील सद्गुरू सेवा धाम गोशाळेत दत्ता महाराज कदम यांच्या कडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!