छत्रपती संभाजी नगर
कन्नड तालुक्यात ऊसाच्या ट्रकला अपघात; ढिगाऱ्याखाली दबून 6 जणांचा मृत्यू

कन्नड:ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. पिशोर घाट परिसरात उसाने भरलेला ट्रक कन्नडहून पिशोरला जात असताना ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये 17 मजूर होते. पिशोर घाटात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. काही मजूर ट्रकच्या वर बसले होते. त्यामुळे अपघातानंतर कामगार रस्त्यावर पडले आणि उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जणांना जखमी उपस्थेत बाहेर काढण्यात आले. तातडीने जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 2 मजूरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्यांची नावे
किसन धन्नू राठोड
मनोज नामदेव चव्हाण
विनोद नामदेव चव्हाण
मिथुन महारू चव्हाण
कृष्णा मुलचंद राठोड
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण
