सोयगावच्या तहसील कार्यालयात विवीध विभागातील अनियमितता थांबवा – भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वेगवान मराठी
सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार मुख्यालयी न राहता छ्त्रपती संभाजीनगर येथून अपडाऊन करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नाही मुख्यालय न राहणाऱ्या तहसीलदार व तत्सम अधिकारी कर्मचाऱ्यांचे घर भाडे भत्ता बंद करण्यात यावा तसेच विविध मागण्या संदर्भात भारतीय जनता पार्टी सोयगाव तर्फे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना सोयगाव तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे सोयगाव येथे शासकीय आढावा बैठकीस आले असता त्यांना भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. तसेच प्रशासना संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात सोयगाव तहसील कार्यालयात नियुक्तीस असलेल्या तहसीलदार मनीषा मेने जोगदंड या छत्रपती संभाजी नगर येथून अपडाऊन करतात.त्या कार्यालयात दुपारी दोन वाजे नंतर येतात व कार्यालय सुकण्यापूर्वीच कार्यालयातून चार वाजेला निघून जात असल्याने तालुका प्रशासनावर कोणताही वचक राहिलेले नाही. सर्व कर्मचारी अपडाऊन मध्ये आपला वेळ घालवत असल्यामुळे जनतेची कामे होत नसल्याने कुचंबना होत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे घर भाडे भत्ते थांबविण्यात यावे, सोयगाव पुरवठा विभागात शिधापत्रिका संदर्भात नाव कमी करणे नाव वाढवणे या ऑनलाइन कामासाठी सर्रास पैसे घेण्यात येत असल्याने जनता हैराण झाली आहे. पुरवठा विभागाच्या गोडाऊन मधून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या रेशन मध्ये गोणीमागे चार ते पाच किलो कमी धान्य दिल्या जात असल्याने त्याची चौकशी करण्यात येऊन गोदामपालाला सेवेतून निलंबित करण्यात यावे, सोयगाव तहसील कार्यालयातील सर्व विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ चालू करण्यात यावे, व जरंडी गावातील धान्य दुकानाला पुरवठा विभागाच्या गोडाऊन तर्फे करण्यात आलेला दहा क्विंटल धान्य कमी भरलेले आहे. व ६२ शिधापत्रिका धारक धान्य पासून वंचित आहेत. याबाबत गोदामपालावर गुन्हा नोंद करण्यात यावा आधी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बद्री राठोड शहराध्यक्ष योगेश पाटील, सुनील गावंडे, ,माजी सरपंच वसंत बनकर मंगेश सोहणी , संजय तायडे , संजय पाटील , संजीवन सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो ओळ : सोयगाव तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देताना भाजपाचे शिष्टमंडळ
