छत्रपती संभाजी नगर
सोयगाव पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा

वेगवान मराठी
जागतिक महिला दिननिमित्त सोयगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सोयगाव शहरातील समाजसेविका लता कांबळे,संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथील विद्यार्थिनी यांचा गौरव करून,तसेच सोयगाव पोलीस ठाणे अंतर्गत पुरुष पोलीस कर्मचाऱ्याप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी सोनाली बिंडे,व महिला होमगार्ड कर्मचारी आरती न्हावी यांचा गौरव उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी चद्राकांत दौड,नारायण जिरी,रवींद्र तायडे,अजय कोळी,राजू सुके,सह होमगार्ड कर्मचारी विजय चौधरी,लोकेश जाधव,विशाल वराडे,सचिन इंगळे,अरुण वाघ,राहुल जाधव,बापू लव्हाळे,योगेश बोखारे,अश्फाक शेख,यांनी परिश्रम घेतले आहे.
