भाजपच्या या 3 महिला उमेदवारांवर पराभवाचे सावट
These 3 women candidates of BJP are in the shadow of defeat

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी: –दि 21 नोव्हेंबर–पंधरा दिवस चाललेल्या प्रचाराचा उडलेला धुरूळा अखेर काल मतदान पेटीत विसावला गेला,रात्री पासुण तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे,आणि आज पासुण ग्रामिण भागात चावडीवर तर शहरी भागात चहाच्या टपऱ्यांवरच्या राजकीय विश्लेश्कांचे पेव फुटायला सुरु झाले आहेत…
खरं पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात कमालीची उदासिणता दाखवली जाते,त्यातुन हि काही महिला नेतृत्व समोर आले तर पुरुषप्रधान संस्कृतीसह राजकारणी पुढारी त्यांना दाबण्याची एकही संधी सोडत नाहीत,आशाच घटणेतुन पुढे आलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडुण येऊण आमदार झालेल्या 3 महिला माजी आमदारांवर काल मतदान पार पडलेल्या निवडणुकीत पराभवाचे सावट घोंघावत आहे….
1 शेवगाव-पाथर्डी–
निवडणुका पार पडत असताना अनेक ठिकाणी पैसे वाटप, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिली जाते. यामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अपक्ष उमेदवार जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यातील लढत पाहायला मिळाली.मोनिका राजळे यांची पारंपारीक वोटबैंक विरोधात गेल्यामुळे शेवगाव पाथर्डी मतदार संघात मोनिका राजळे यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे…
2-जिंतुर विधानसभा मतदार संघ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विजय भांबळे आणि बहुजन वंचित आघाडीचे सुरेश नागरे यांच्यात अटीतटीचा सामना रंगला असल्यामुळें जिंतुर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार मेघना बोर्डीकर या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आसुण भाजपचा आणि मेघणा बोर्डीकर यांचा हाक्काचा ओबीसी मतदार हा सुरेश नागरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा टाकलेला दिसत आहे,याचबरोबर ,आंबेडकर विचाराचे मतदार आणि मुस्लिम मतदारांचा कल पाहता वंचीत आघाडीचे सुरेश नागरे आणि मराठा आरक्षणाच्या धगीमुळे तुतारी हाती घेऊण मैदनात उतरलेले माजी आमदार विजय भांबळे पाटील यांच्यात लढत होत आसुण भाजपच्या मेघना बोर्डीकर पराभवाच्या छायेत आहेत.
3-केज विधानसभा मतदार संघ
नमिता मुंदडा —केज विधानसभा मतदार संघ हा अनेक वर्षांपासून राखीव असल्यामुळें स्व विमल मुंदडा यांच्या नंतर या ठिकाणी सक्षम नेतृत्व तयार होऊ शकले नाही,2014 च्या निवडणुकीत भाजपच्या संगीता ठोंबरे या मतदार संघातुन आमदार झाल्या होत्या,परंतु संगीता ठोंबरे यांची प्रतिमा काही कारणासत्व मलिन झाल्यामुळें,नमिता मुंदडा यांनी भाजपच्या लाटेत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश घेण्या आधीच भाजपाचे तिकिट पदरात पाडून घेतले आणि 30 हजार मतांनी विजय संपादन केला,नमिता मुंदडा यांचे हायप्रोफाईल राहणीमान,लोकसभा निवडणुकी मध्ये पंकजा मुंडे यांचा हातचा राखुण केलेला प्रचार,मतदारसंघाच्या समस्या वाऱ्यावर सोडुण केलेला स्वतःचा विकास आणि गुत्तेदारांच्या चौकडीला दिलेले महत्व या गोष्टी मतदारांना आवडल्या नाहीत,याचबरोबर प्रतिस्पर्धि उमेदवार पृथ्वीराज साठे यांना मराठा समाजाची मिळालेली भक्कम साथ नमिता मुंदडा यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास पुरेशी होऊ शकते….

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








