महाराष्ट्र

Maratha reservation 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, नाहीतर…मनोज जरांगे

Maratha reservation will attack Marathas again - Manoj Jarange

वेगवान मराठी

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. तसेच, मागावर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल. तेव्हा, आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं. मात्र, मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मराठ्यांचा घात होणार

यावर मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “मागासवर्गीय अहवाल फेब्रुवारीत येण्याबाबत आम्ही अनभिग्न आहोत. मागावर्गीय अहवालाची मागणी आम्ही आता केली नाही. कारण, त्यात खूप शंका आहेत.

मागावर्गीय अहवालानंतर आरक्षण एनटी आणि व्हिजीएनटीसारखं न्यायालयात टीकेल की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे आरक्षण टीकणार नाही कारण ते ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते. पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे.”

मुख्यमंत्री शिंदेंची मराठा आरक्षणासाठीची (Maratha Reservation) फेब्रुवारीची डेडलाईन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) मात्र अमान्य केली आहे. 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारने पाळला नाही, तर आम्हाला नव्याने आंदोलन उभारावं लागेल असा इशाराच मनोज जरांगेनी सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची ही डेडलाईन आम्हाला मान्य नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. शिंदेंच्या भाषणाचा एक अर्थ म्हणजे सर्वांना आरक्षण मिळणार असं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!