राजकारण

महाराष्ट्रात महायुतील इतक्या तर मविआ ला एवढ्या जागा मिळणार, एक्झिट पोल जाहिर

महाराष्ट्रात महायुतील इतक्या तर मविआ ला एवढ्या जागा मिळणार, एक्झिट पोल जाहिर

वेगवान मराठी

मुंबई, ता. 1 जून 2024 – लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला आहे, त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागले आहे. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.

महाराष्ट्रात नेमकं काय होणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य दाखवलं जातंय.  महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहेच.

पण त्याआधीच निकालाआधीचा महानिकाल पाहणार आहोत. देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार, याचा अंदाज वर्तवलाय.  महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व ४८ जागांवरचा कल काय आहे, हे पाहूयात..

Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील ?

एक्झिट पोल एजन्सी महायुती महाविकास आघडी इतर
ABP News-CVoter 24 23 1
TV9 पोलस्ट्राट 22 25 1
Republic Bharat-Matrize 30-36 13-19 00
Republic PMARQ 29 19 00
News18 exit poll 32-35 13-16 00
School of Politics 31-35 12-16 00
TIMES NOW Survey exit polls 26 24 00
News 24 Chanakya exit polls report 33 15 00
Rudra survey 13 34 01
NDTV India – Jan Ki Baat
34-41 9-16 00

महाराष्ट्रातील 2019 एक्झिट पोलमधील अंदाज किती खरा ठरला ?
2019 लोकसभा निवडणूक निकालाआधी आलेला एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आघाडीला 36 ते 38 जाग मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण निकालनंतर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला 41 जागांवर यश मिळाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये 10 ते 11 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.. अमरावतीमधून नवनीत राणा यांचा विजय झाला तर औरंगाबादमधून इम्तियाज जलील निवडून आले. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला. महत्वाचं 2019 मध्ये एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला वर्तवलेल्या अंदाजापेक्षा निकालात जास्त जागा मिळाल्या होत्या.

एक्झिट पोल एजन्सी एनडीए यूपीए अन्य
1. News18 Mega Exit Poll 355-370 125-140 42-52
2.Jan Ki Baat 363-392 141-161 10-20
3. CNX. 371-401 109-139 28-38
4. ABP News-CVoter
231-275 122-161 02-10
5. Republic-Matrize 353-368 118-133 43-48
6. INDIA TODAY – AXIS MY INDIA 161-180 79-100 3-11
7. DAINIK BHASKAR 281-350 145-201 33-49
8. INDIA TV 371-401 109-139 28-38
9. TV9 पोलस्ट्राट 216 134 21
10. Republic TV PMARQ 359 154 30
11. News Nattion 342-378 153-159 21-23
2019 मध्ये एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला –
2019 एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएनं 543 मधील 353 जागांवर विजय मिळवला होता. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांद सत्ता स्थापन केली. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेस प्रणित युपीएला 91 जागा मिळाल्य होत्या. काँग्रेसला 51 जागा मिळाल्या होत्या.

2019 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळल्या होत्या ?
एक्झिट पोल एजन्सी एनडीए यूपीए अन्य
1. News18-IPSOS 336 82 124
2. India Today-Axis My India 339-365 77-108 82
3. News24-Todays Chanakya 350 (+/-14) 95 (+/-9) 97 (+/-11)
4. Times Now-VMR 306 132 104
5. India TV-CNX 300 (+/-10) 120 (+/-5) 122 (+/-6)
6. ABP-CSDS 277 130 135
7. India News-Polstrat 287 128 127
8. CVoter 287 128 127
9. Newsx Neta 242 164 ….

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक संस्थेने देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस – मायनस 3 ते प्लस – मायनस 5 टक्के इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!