
प्रेस नोट दि. 17/05/2025 परळी तालुक्यातील जलालपुर येथे किरकोळ भांडणाच्या कारणावरुन एका तरुणास जमावाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न
या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर परळी येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन एका अल्पवयीन आरोपीसह एकूण ०७ आरोपी पोलीसांनी घेतले ताब्यात,
अफवा न पसरवण्याचावत पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँयत यांचे जनतेला आवाहन
वेगवान मराठी परळी प्रतिनिधी केशव डी मुंडे दिनांक 17 /5/2025 रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास पाळी तालुक्यातील जलालपुर येथे हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम असल्याने फिर्यादी श्री शिवराम नारायण दिवटे, वय १८ वर्षे, रा. लिंबोटा ता. परळी, नि. बीड है जयदिप मुंडे नावाच्या त्यांच्या मित्रा सोबत सदर कार्यक्रमास गेले होते.
त्याच ठिकाणी फिर्यादी व त्यांचा मित्र असे जेवण करीत असतांना काही मुलांचे तेथे भांडण झाले.
त्यानंतर दुपारी ०३.०० ते ३.३० वा. दरम्यान फियांदी हे त्यांचे मित्र जयदिप मुंडे यांच्यासह मोटार सायकलवरून जयदिप चीरे नावाच्या मित्रास सोडण्यासाटो शिवाजीनगर येथे गेले. तेथून फिर्यादी हे मित्र जयदिप मुंडे याच्यासह मोटारसायकलने लिबोटी गावाकडे जाण्यासाठी निघाले.
त्यानंतर फिर्यादी हे मित्रासह रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आले असता तेथे तीन ते घार मोटार सायकल स्वारांनी येऊन फियांची मोटार सायकल अडवून थांबवून त्यास हातांनी मारहाण करुन जबरीने मोटार सायकलवर बसविले व जबरदस्तीने रत्नेश्वराच्या डोगरातील झाडीमध्ये घेऊन गेले तसेच मोटारसायकल वरुन उत्तरवून हा थी त्या भांडणात होता असे बोलून याला जीवेच मारुन टाका असे म्हणून
घटणास्थळी हजर असलेल्या सुमारे २० जणांनी फिर्यादी शिवराज नारायण दिवटे यांस लोखंडी रौड, लोखंडी कती बेल्ट, काचेची बॉटल व लाकडी काठी इ. हत्यारांनी मारुन गंभीर जखमी करुन जोवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्यादी हे जोरजोरात ओरडत असतांना कोणीतरी सदरचा ऐकूष्ण फिर्यादीचे मदतीला आले.
परंतु तोपर्यंत फिर्यादी हे बेशुद्ध पडले होते. सदर मारहाणीचा कोणी तरी मोबाईल फोनव्दारे व्हिडीओ रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला
त्यानंतर फियोदी यांच्यावर सरकारी दवाखाना परळी येथे प्रथमोपचार करण्यात येऊन नंतर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई येथे पुढील उपचार कामी रवाना करण्यात आले. सध्या फिर्यादीची तब्येत स्थित असून उपचार चालू आहेत.
सदर प्रकरणी फिर्यादी शिवराज नारायण दिवटे यांच्या फिर्याद वरुन पोलीस ठाणे संभाजीनगर परळी येथे गुरनं. १०५/२०२५, कलम १०९, १२६८(२) १४०(३) ११८९१८११२१८१४११०, १९१(३) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
एकूण २० आरोपीं पैकी १) सचिन विष्णू मुंडे, यथ २४ वर्षे, रा. नंदागौळ, ता. परळी, २) रुषीकेश ज्ञानोबा गिरी, वय १८ वर्षे, रा. टोकवाडी, ता. परळी, ३) रोहण उमेश वाघळकर, वय १८ वर्षे, रा. विद्यानगर, परळी वै, ४) समाधान श्रीकृष्ण मुंडे, वय २० वर्षे, रा. टोकवाडी, ता. परळी, ५) अदित्य बाळासाहेव गिते, वय १८ वर्षे, रा.नंदागौळ ता.परळी जि. बीड
यांच्यासह इतर ०२ अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपीचा विविध पथकांच्या माध्यमांतून शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री धनंजय डोणे, पोलीस ठाणे संभाजीनगर परळी हे करीत आहेत
नमूद गुन्हयातील आरोपी हे मराठा, वंजारी, बौध्द, गोसावी व माळी समानाचे असून षामध्ये कोणताही जाती जातीतील संघर्ष नाही.
सदर गुन्हयाचे कारण हे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या भांडणाचे असून सर्व आरोपी हे तरुण युवक आहेत
त्यामुळे कोणती सदर प्रकरणाला जातीय रंग देऊ नये तसेच याप्रकरणी समाज माध्यमांवर भडक प्रतिक्रीया देऊ नये असे श्री नवनीत कॉवत,पोलीस अधिक्षक बीड यांनी जनतेला आवाहन केले आहे.
पोलीस अधीक्षक बीड, प्रति : – wegwan marathi news network maharasthra keshav dnyanoba munde 8888 387 622 beed

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








