आईचा व पिलाचा विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून दुर्दैवी मृत्यू
विजय चौधरी-सोयगाव ,छत्रपती संभाजीनगर
पाण्याच्या शोधात असलेल्या मादी जातीच्या वानर व तिच्या पोटाशी असलेल्या छोट्या पिलाचा मुख्य प्रवाहाच्या विद्युत वाहिनीच्या तारेला चिटकून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली
सोयगाव तालुक्यातील दुष्काळाची झळा वाढत आहे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत रविवारी दहा वाजेच्या सुमारास मादी जातीची वानर व तिच्या पोटाशी असेलल्याल छोट्या पिलाचा पाण्याच्या शोधात भटकंती करत असतांना कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी मुख्य प्रवाहाच्या विद्युत वाहीनीच्या लोखंडी पोलवरील तारेला चिटकून दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे जरंडी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली यावेळी महावीतरन कर्मचारी, ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी यांनी मृत मादी वानर व तिच्या पिलावर अंत्यसंस्कार केले यावेळी महावितरणचे बाळू निकम, योगेश सोंने, वनविभागाचे संतोष चव्हाण, श्रीराम वाघ, डॉ अविनाश पाटील, गणेश पाटील, आनंद निकम, रवींद्र पाटील, मयुर पाटील, मयुर चौधरी, गोपाल हिरे, किरण पाटील,योगेश चौधरी ,जय मोहिते यांच्या सह आदि ग्रामस्थांनी वानर व तिच्या पिलावर अंत्यसंस्कार केले
