
वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 1 जून 24- पुण्यातील कल्याणीनगर अल्पवयीन मुला कडून अपघात घडून तरूण तरूणीचा जीव गेला या एक महिना होत नाही तर पुण्यातील कर्वेनगर नळ स्टॉप येथे एका क्रेनने सायकल स्वारास उडविले त्याचा जागीच मृत्यू झाला•
नळस्टॉप हे पुण्यातील अतिशय गर्दीचे ठिकाण या चौकात बेभानपणे वाहने चालवितात या चालकावर कोणाचेही बंधन नाही• कर्वेनगर विभागात दिवसा जड वाहनांना बंदी असतांनाही जड वाहने वाहतूक करणारे हे वाहतूक पोलीसांना जूमानत नाही• दिवसा क्रेन वाहतूकीला सूध्दा बंदी असतांना ही वाहने कशी सुसाट धावतात•
नळस्टॉप या भर चौकात सायकल स्वार सायकल चालवित होता याला क्रेनने धडक दिली असता या सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला• एक पुण्या मध्ये कोणत्याही चौकात एकही वाहतूक पोलीस हजर नसतात असले तरी एक बाजूला सावज हेरत राहतात सिग्नल सुरू झाल्यावर वाहने सुसाट वेगाने धावतात शहराच्या मध्यभागी वाहन चालवितांना वेगाला मर्यादाच राहली नाही.
यावर वाहतूक पोलीसांचे लक्ष नसल्या कारणाने जनतेचा बळी जाण्याचा प्रकार घडत आहे दिवसा ढवळ्या असे अपघाताचे प्रकार सतत घडत राहल्यास याला कोण जबाबदार राहील•अपघाताचे प्रमाण पुण्यात वाढत आहे यावर तातडीने वरिष्ठ वाहतूक अधिकारी यांनी लक्ष पुरवण्याची आणि उपाय योजना करण्याची गरज आहे•
