राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी चूक केली का? पत्नीही निवडु शकतं नाही पहा वेगवान मराठी स्पेशल
राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी चूक केली का? पत्नीही निवडु शकतं नाही did-ajit-pawar-make-a-mistake-by-breaking-ncp-even-the-wife-cannot-choose

वेगवान मराठी / अरुण थोरे
नाशिक, ता. 3 में 2024 – देशात लोकसभेचं मतदान झालं. निकाल काही तासांवर येऊन ठेपलायं. देशातं एनडीए सरकार आघाडीवर आहे. असा एक्झिट पोलचा अंदाज आला. मात्र हाच अंदाज महाराष्ट्रात महायुतीसाठी धक्कादायक आहे. खासकरुन करुन अजीत पवारांना भोपळाही फोडता येणार नाही. जर राष्ट्रवादी फोडून अजीत पवारांनी शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. जर खरोखर अजीत पवारांच्या राष्ट्रवादीची एकही जागा आली नाही. आणि स्वतची बायको जर पराभूत झाली तर अजीत पवारांनी राष्ट्रवादी फोडून मोठी चुक केली का…तसेच उध्दव ठाकरेंच्या शिवसेनाला जर १४ जागा मिळत असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना.. अजीत पवारांनी राष्ट्रवादी तर एकनाथ शिंदेनी शिवसेना स्वाताची करुन घेतली मात्र जनतेने याचं उत्तर तर दिलं तर नाही ना..चला तर जाणून घेऊया.did-ajit-pawar-make-a-mistake-by-breaking-ncp-even-the-wife-cannot-choose
पहा व्हिडीओ अजीत पवारांची
नमस्कार मी शिला ठाकरे तुम्ही पाहतायं वेगवान मराठी… राजकारणात काही घडू शकतं याच प्रत्येय महाराष्ट्राने या पाच वर्षात पाहिलायं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून आपली वेगळी चुल मांडली. शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आमदार फोडून भाजपा सोबत सरकार स्थापन केलं. यावेळी अजित पवारांनी शिंदेवर मोठी टिका केली होती. मात्र ज्या वेळी अजीत पवारांनी राष्ट्रवादी फोडली त्यावेळी मात्र जनतेच्या नजरेत अजित पवारांची प्रतीमा बदलून गेली. राजकारण हा एक नाद आहे..आणि या नादामध्ये पदाचा मोह माणसाला काहीही करण्यास भाग पाडतो. अजीत पवारांच्या बाबत तेच घडलं.
देशात मोदी सरकार येणार हे पोलचे आकडे सांगतात. मात्र महाराष्ट्र मध्ये महायुती पिछाडीवर जातांना दिसत आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. यासोबतच या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बल 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शिवसेना फुटी नंतर ज्या अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली की,ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली ते परत निवडून आले नाही हा इतिहास आहे. त्याच अजित पवारांवर राष्ट्रवादी फोडीनंतरच्या पहील्याच निवडणुकीत एक्झिट पोल च्या सर्वे नुसार एकही जागा मिळत नसल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे. ह्याच अजित पवारांना एका वृत्तवाहिनीने शिवसेना कुणाची हा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी दिलेले उत्तर होतं शिवसेना कोणाची हे जनता ठरवेल तीच अवस्था आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची झाली आहे.
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून सुरुवात झालेलं हे राजकीय धक्कातंत्र शिवसेनेतील फूट, फडणवीसांचं उपमुख्यमंत्रिपद ते थेट राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांच्या हातून जाण्यापर्यंत सुरुच राहिलं.
अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात दुसऱ्यांदा बंड केलं आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण यावेळी पवारांना हे बंड शमवता आलं नाही. कारण यावेळी अजित पवार केवळ सरकारमधून किंवा, पक्षातून बाहेर पडले नाहीत तर त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. पक्षात शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अशी फूट पडली. कारवाया-प्रतिकारवाया झाल्या.
शिवसेनेप्रमाणेच ही लढाई निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांपर्यंत जाऊन पोहोचली.निवडणूक आयोगानंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडेच राहील असा निर्णय दिला होता.
चार जूनच्या लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाचं उत्तर जनतेकडून मिळणार असलं तरी राष्ट्रवादी फुटीने भाजप व अजित पवारांनी काय साध्य केलं? हाही एक प्रश्न समोर येतोय २०१९ ला भाजप शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या तर २०२४ च्या सर्वे नुसार महायुतीला २५ ते २७ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. हा सर्व परीणाम फोडा-फाडीच्या राजकारणाचा असल्याच बोललं जातं आहे.
ज्या अजित पवारांनी शिवसेना फुटी नंतर शिंदेवर टीका केली की, एवढाच दम होता तर स्वतः पक्ष काढायचा, त्याच अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष पळवुन मोठी घोडचूक केल्याचं बोललं जातय.
एकनाथ शिंदेंनंतर सध्याच्या राजकारणात धक्कातंत्र वापरुन आपल्या राजकीय कारकीर्दीला वेगळं वळण दिलं आहे अजित पवारांनी.आपल्या काकांविरुद्ध बंड करुन त्यांनीही भाजपासोबत मैत्रीची वेगळी चूल मांडली. काहींचा पाठिंबा मिळाला, तर काहींचा रोष. त्यामुळेच आपला स्वतंत्र जाण्याचा निर्णय अजित पवारांनी या निवडणुकीत पणाला लावला आहे.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्यासमोर बारामतीच्या निवडणुकीत विरोधात उभ्या राहिल्यानं कुटुंबातली नातीही पणाला लागली. शरद पवारांच्या विरोधात पहिल्यांदाच वेगळं जाऊन स्वतंत्र राजकीय चूल मांडणाऱ्या अजित पवारांचं राजकीय भविष्यही या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.
आपला स्वतंत्र जाण्याचा निर्णय अजित पवारांनी या निवडणुकीत पणाला लावला आहे.शिंदेंसारखं या निवडणुकीच्या निकालानं हे सिद्ध होईलच की अजित पवारांचा बंडाचा, ‘राष्ट्रवादी’वर दावा सांगण्याच्या निर्णयाला जनाधार आहे किंवा नाही. अजित पवार त्यांच्या चिन्हावर चारच जागा लढत आहेत, पण तिथंल यश निर्भेळ असेल तर ‘राष्ट्रवादी’ची पुढची पिढी त्यांच्या बाजूला आहे असा संदेश जाईल.
अजित पवारांची पक्षांतर्गत ताकदही नेमकी किती आहे ते समजेल. या जागांवर मिळालेल्या यशावर विधानसभेतलं भवितव्यही अवलंबून आहे.पण या थोडक्या जागांवरही अजित पवारांना अपयश आलं तर त्याचा परिणाम त्यांच्या कारकीर्दीवर होईल. शरद पवारांशिवाय त्यांचं अस्तित्व काय या विरोधकांच्या प्रश्नाला ते एका प्रकारे उत्तर असेल. अजित पवारांसोबत गेलेले आमदारही भविष्याच्या विचाAर करु लागतील.
मुख्य म्हणजे भाजपा नेतृत्वाच्या लेखी अजित पवाराचं महत्त्व किती राहील हे या निवडणुकीच्या यशापयशानं ठरेल. त्यावरुन महायुतीतलं त्यांचं स्थान, मुख्यमंत्रिपदावरचा दावा हे सगळंच अवलंबून आहे. त्यासाठीच त्यांचा राजकीय कारकीर्दीतला आजवरचा सर्वांत महत्वाचा निर्णय या निवडणुकीत पणाला लागलेला आहे.
आगामी विधानसभेच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असनार आहे कारण, ह्याच निकालावर महाराष्ट्र विधानसभेची गणितं अवलंबून असनार आहे. कोण अजित पवारांसोबत राहील अन् कोण शरद पवारांकडे जाईल हाच निकाल ठरवणार आहे.
