तरुणाचे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू; अजूनही प्रशासनाच्या वतीने तोडगा काढण्याच्या हालचाली नाहीत

विजय चौधरी/वेगवान मराठी
सोयगाव तालुक्यातील तिडका येथे मालकीच्या जागेवर ताबा मिळावा यासाठी किरण आजीनाथ सातपुते या तरुणाचे तीन दिवसापासून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू असून तरुणाची तब्येत खालवली आहे मात्र अद्यापही तालुका प्रशासनाकडून तिसरा दिवस उलटूनही या उपोषणाची शहानिशा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले नसल्याने उपोषण कर्त्याची तब्येत अधिक खालवत आहे
किरण आजीनाथ सातपुते या तरुणाने हातमजुरी करून २०१३ मध्ये तिडका येथे ३०×३० अशी नऊशे क्वेअर फूट जागा आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी व्यवसायिक दुकानाच्या दृष्टीने घेतली मात्र याठिकणी बांधकाम सुरू करत असताना गावातील दोन जणांनी किरण यास या जागेवरून बांधकाम करू नको ही जागा आमची आहे असे सांगून जीवेमारण्याची धमकी दिली, याचाच जाब सदरील तरुणाने ग्रामपंचायत ला विचारला असता ग्रामपंचायतने याबाबत कुठलाच निर्णय दिला नाही अखेर किरण सातपुते या तरुणाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला
किरण सातपुते याचा आज उपोषणाचा तिसरा दिवस त्याची प्रकृती खालवली आहे तालुका वैद्यकीय अधिकारी गीतेश चावडा यांच्या मार्गदर्शनाखाली सिएओ डॉ.कोमल ठाकरे यांची उपोषणकर्ता किरण याची तपासणी केली असता किरणने सलाईन लावण्यास नकार दिला याठिकाणी पोलीस सहायक निरीक्षक पंकज बारवाल यांनी तीन दिवसांपासून बंदोबस्त दिला आहे
