रस्त्यावर जीवघेणे खड्डे; सोयगाव तालुक्यातील तरुणाने स्वखर्चाने टाकला मुरूम

विजय चौधरी/वेगवान मराठी
सोयगाव:मोहळाई ते नागद तांडा पर्यंत चे रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर आपण सर्वजण खरोखर जागृत मतदार आहोत का,असा प्रश्न कुठे तरी पडतो, मग ती पंचायत समितीची निवडणूक असो की जिल्हा परिषद ची किंवा विधानसभेची,आपण किती सहज मतदान करतो अश्या वेळी बांधवांनो आपण अभ्यासू उमेदवार कोण हे तपासले पाहिजे मग पक्ष कोणताही असो,
मित्रांनो आज रोजी कुणी 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण सांगून निवडणूक जिंकून येतो कुणी मी असा करेल तसा करेल प्रचंड आश्वासनांचा पाऊस पाडून जनतेला प्रलोभन दाखवून निवडणूक लढवतात पण आज सत्तेवर असलेले किंवा विरोधात असलेले सगळेच मोहळाई ते नागदतांडा रस्त्यावरून आजचे विधानसभा सदस्य आणि भावी आमदार म्हणून तयारी करणारे सगळेच सदर रस्त्यावर अनेकदा ये जा ये जा करतांना दिसतात परंतु त्या सर्वांना कुणालाही अशी समस्या जाणवली नाही की,ह्या रस्त्याचे काम होणे किती गरजेचे आहे असो त्या सर्व्याना त्याची जाणीव बहुतेक झाली नसावी कारण ते ज्या गाडीतून फिरतात त्यातून त्यांना कदाचित सामान्य माणसांना जो त्रास समस्या त्या रस्त्यावरून वावरताना होते ,ती त्यांना होत नाही सदर रस्त्यामुळे कित्येक लोकाना आज रोजी मणक्याचा त्रास,पाठीचा त्रास,असे असंख्य आजारांना सामोरे जावे लागते लोकप्रतिनिधी म्हणून कुणीही 15 ते 20 हजार रू खर्च करू शकत नाही आणि निवडणूक काळात मतांसाठी लाखो रू खर्च करतात आणि त्या वेळी सामान्य जनतेची फसवणूक करून मत घेतात ज्यांची खरोखर लोकांशी नाळ जुळलेली असते त्यांना लोकांच्या समस्या तात्काळ लक्षात येतात आणि समस्याचे निराकरण केले जाते परंतु ढोंगी लोक ढोंग दाखवून अथरून पाघरून घेतात आणि सोंग करतात ह्यातून मंजूर करतो त्यातून मंजूर करतो अशी आश्वासने देऊन काढते पाय घेतात
असो आज रोजी सदर खड्डे स्वखर्चातून मुरूम टाकून लोकाची तात्पुरता का होईना मोहळाई,पिंपरी आंतुर येथील समाजसेवक प्रवीण राजपूत यांनी स्वखर्चातून लोकांना रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून तात्पुरता सुटका केली अस मत रस्त्याने ये जा करणारे चाकरमानी ,लोक, बोलत होते
तसेच बहुतेक लोकांनी आभार ही मानले आणि हा रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा बोलून दाखवली
