देश -जग

फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला पावसाचा तडखा बसणार !

वेगवान मराठी / धिरेंद्र कुलकर्णी

मुंबई, ता. 30 नोव्हेंबर 2024 –  भारत देशावरती एक मोठा संकट घोंगावत आहे. ते संकट म्हणजे फेंगल या चक्रीवादळ, या चक्रीवादळाने आता रौद्ररूप धारण केलेला आहे. या चक्रीवादळामुळे  मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. आंध्र प्रदेश मध्ये पावसाचा जोर वाढलाय मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेला आहे. या फेंगल  चक्रीवादळाचा महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे.  शेवटी हा निसर्ग आहे. तो नियमात राहुचं शकतं नाही.

महायुतीचा मुहुर्त अखेर ठरला,या दिवशी होणार शपथविधी समारोह

फेंगल या चक्रीवादळामुळे हवामान विभागाने एक मोठा अलर्ट जारी केलेलं आहे. या अगोदर लोकांना कळण्यासाठी भारतीय हवामान विभाग वेळोवेळी सूचना देत होतं. या चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केलेला आहे. उद्या हे चक्रीवादळ किनारपट्टीवर आढळणार आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यामुळे मुसळधार असा पाऊस पडणार आहे.

महायुतीचा मुहुर्त अखेर ठरला,या दिवशी होणार शपथविधी समारोह

चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचं स्वरूप प्राप्त होईल. आताही या चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी 80 किलोमीटर प्रति घंटे वेगाने असल्यामुळे हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावर अजून कमी दाबाचा  प्रणाली तयार करत आहे.

महाराष्ट्रातून जाणारा नवीन रेल्वे मार्ग कोण कोणत्या गावातून

तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. फेंगल चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने सुमारे 12 लाख रहिवाशांना एसएमएसद्वारे अलर्ट पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्रातून जाणारा नवीन रेल्वे मार्ग कोण कोणत्या गावातून

केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमधील सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. NDRF ची टीम ही या ठिकाणी पोहोचली आहे. फेंगल चक्रीवादळामुळे लोकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटनस्थळे ही बंद ठेवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ दिनांक 1 डिसेंबरला तमिळनाडू येथे पुद्दुचेरीच्या उत्तरेस (लँडफॉल ) धडकण्या ची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर याचे वेल मार्ग लो प्रेशर (WML ) मध्ये रूपांतर होईल आणि पुढे अरबी समुद्र कडे जाईल.दिनांक 2 ते 9 डिसेंबर वरील 🌧️⛈️ चक्रीवादळाच्या परिणाम स्वरूप महाराष्ट्रात वातावरण खराब होण्याची शक्यता आहे .

1 डिसेंबरला राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. दि 2 ते 5 डिसेंबर पर्यंत राज्यात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ येथे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण व भाग सुटत किंवा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम अवकाळी पावसाची शक्यता आहे.दिनांक 10 डिसेंबर पासून अवकाळी पावसाचे वातावरण कमी होईल व थंडी वाढायला सुरुवात होईल. असा अंदाज हवामान तज्ञानी व्यक्त केलायं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!