महाराष्ट्र

महाराष्ट्रात बदा बदा पाऊस पडणार

It will rain frequently in Maharashtra

वेगवान मराठी / दिपक पांड्या

नवी दिल्ली, ता. 20 – It will rain frequently in Maharashtra भारत हा कृषिप्रधान देश आहे भारताला पाऊस सर्वात महत्त्वाचा आहे. पाऊस फक्त पाणी पिण्यासाठी नाही तर शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असल्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष पावसाच्या आगमना वरती लागून असतं.

पाऊस किती प्रमाणात पडतो आणि कसा पडतो याच्यावरती भारताच्या शेतीचं गणित अवलंबून असतं. आता लवकरच आपण काही दिवसांमध्ये नवीन वर्षांमध्ये आपण पदार्पण करणार आहे. नव्या वर्षांमध्ये महाराष्ट्रात पाऊस एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे.

ज्यावेळेस मान्सूनचा सांगावा येतो त्यावेळेस संपूर्ण जनतेच्या नजरा मान्सूनच्या सांगाव्याकडे असतात कारण हा मान्सून सगळ्यांना सुखद आणि एक प्रेरणा देणार आहे.

मान्सून आगमन होताच मन प्रसन्न होतं मात्र हाच मान्सून जर कधी रुसला तर मात्र खैर नसते म्हणून मान्सूनचं आगमन हे प्रत्येकाला हवहवसं वाटतं.

भारताच्या शेतीवर त्यांनी एक लोक पोट भरत असतात शेतीमुळं संपूर्ण दळणवळण आणि अर्थव्यवस्था अवलंबून असते शेतीतून जर उत्पन्न निघालं नाही तर लोकांना आर्थिक संकटांना सामोरे जावा लागेल.

येणाऱ्या 2025 मध्ये हवामान विभागाने एक महत्त्वाचा अंदाज दिलाय आणि हा अंदाज जागतिक हवामान विभागांना दिलेला आहे. भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण 2025 मध्ये कसे राहील याचा हा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे.

जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून, या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.ला निना आणि अल निनो हे दोन वाऱ्यांचे प्रकार आहेत. याचा परिणाम हा भारतातील मान्सूनच्या पर्जन्यमानावर होतो. जर ला निना सक्रीय असेल तर चांगला पाऊस पडतो. कधीकधी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. मात्र जर अल निनो सक्रिय झाले तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.या वर्षी भारतात ला निना सक्रिय राहाण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा पावसाचं प्रामाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

ही परिस्थिती जर अशीच राहील तर महाराष्ट्रात बदाबदा पाऊस पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!