बीड

नातेवाईकांनी नाकारलेल्या मयताचा परळीकरांनी केला अंत्यसंस्कार

Citizens of Parli performed the funeral rites of an orphaned body rejected by relatives

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी वैजनाथ दिनांक 14 जुन 2025 शनिवार -सदरील घटणेचा घटणाक्रम खालील प्रमाणे

बालाजी सोळंके नामक बेवारस व्यकती
हा मागील 20 वर्षापासून परळी शहरातील तळ परिसरात राहत होता.रस्त्याच्या बाजूला मयत झाल्याचे आज सकाळी दिसून आले.सामाजीक कार्यकर्ते नितीन शिंदे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात व पालिकेस फोन वरुण कळवले.

मयत सोळंके यांची परभणी शहरात वासत्वास असलेली रक्ताच्या नात्याची सखी बहीण असल्याची माहिती मिळाली आसता पोलिसांनी त्या महिलेशी संपर्क केला असता माझा भाऊ आणि माझा मागील 20 वर्षांपासून काहीही संबंध नाही आसे मयताच्या सख्या बहिणीकडुण निर्दयीपणे सांगीतले व भावाचा अंत्यविधी करण्यास त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

त्यामुळे निर्माण झालेला पेच प्रसंग पाहता सामाजीक बांधिलकी व मृत्यु पश्चात होणारी मानवी देहाची अवहेलना होऊ नये या भावनेतुन परळी शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या

नितीन शिंदे व सेवकराम जाधव यांनी घटणेचे गांभिर्य पाहता परळी शहरातील मान्यवर व्यकती आणि पोलीस प्रशासणाच्या सहकार्याने मयत बेवारस बालाजी सोळंके यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला

त्यानुसार पोलीस प्रशासन,नगर पालिका प्रशासन आणि परळी शहरातील सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांनी मिळून आज रोजी 5:30 वाजता परळी सदरील बेवारस मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला

या वेळी कर्तव्यावर आसलेल्या चरणसिंग वळवी (बीट हवलदार) पोलीस हेड कॉन्स्टेबल परळी शहर पोलीस स्टेशन यांच्या समक्ष व अधिकृत सहमतीने

सामाजीक कार्यकर्ते नितीन शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव सर, शिवाजी देशमुख,वेगवान मराठीचे उपसंपादक पत्रकार केशवराव मुंडे आबासाहेब देशमुख, उत्तम मोरे व इतरांनी यामध्ये सहभाग नोंदवला…

साजिद खान गुत्तेदार यांच्या दुकाना समोर रात्रीच्या वेळी सदरील मयत व्यक्ती आसऱ्याला झोपत आसे आणि त्यामुळे आपल्या दुकाणाचे संरक्षण होते याची जाण ठेऊण जाती धर्माचे बंधन तोडुण याप्रसंगी साजीद खान यांनी अंत्यविधी साठी लाकडं (सरपन) दिले.

तर बेकरी वाले माहेमूद खान, प्लम्बर नासिरभाई, अन्नू भाई व इतर मुस्लिम बांधव देखील अंत्यविधीस उपस्थित होते या वेळी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थित  शिवाजीराव देशमुख आणि केशवराव मुंडे यांच्या कडुण मयत बालाजी सोळंके यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करुण श्रद्दांजली वाहण्यात आली

प्रतिष्ठित व सामाजिक क्षेत्राची जाण व आवड असलेल्या मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित परळी वैजनाथ येथील वैकुंठ धाम स्मशान भुमित मयत बालाजी सोळंके यांचयावर हिंदु धर्माच्या रिती रिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार विधी करण्यात आला

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!