क्राईम

परळी येथील गुत्तेदाराचे अपहरणकर्ते सापडले

The kidnappers of Parli-based contractor Tukaram Munde have been found.

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दि.13.06.2026 (परळी ग्रामिण हद्दीतुन अपहरण झालेल्या व्यक्तीची स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने केली सुटका. चार आरोपीस बेड्या)

पोलीस ठाणे परळी ग्रामिण हद्दीमध्ये दि.04.06.2026 रोजी 01.30 वा ते 02.00 वाचे दरम्यान परळी औष्णीक विद्युत केंद्र परिसरामधुन इसम नामे तुकाराम पंढरीनाथ मुंडे वय 54 वर्षे रा. संगम ता. परळी वै.जि.बीड हमु थर्मल कॉलनी परळी ता. परळी जि.बीड याची अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना घडली होती.

सदर घटनेवरून पोलीस ठाणे परळी ग्रामिण येथे गुरन. 266/2026 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याच्या समातंर तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि सुशांत सुतळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोह/मारूती कांबळे, पोह/सचिन सानप, पोह/रामचंद्र केकान, पोह/गोविंद भताने, व पोअ/सचिन आंधळे यांचे विशेष तपास पथक तयार करून,

त्याना योग्य त्या सुचना देवुन सदर पथकाने तात्काळ घटनास्थळावर जावुन घटनेची संपुर्ण माहिती घेवुन घटनेच्या परिसरातील CCTV फुटेज चेक करून त्यामधुन मारूती सुझुकी कंपनीची गाडी निष्पन्न केली.

निष्पन्न झालेल्या गाडीचा CCTV फुटेजद्वारे अमरावती पर्यत माग काढून, अमरावती येथे गेल्यानंतर त्याठिकाणी गुन्ह्यातील पिडीत व आरोपीची पुर्ण माहिती घेवुन, पिडीत व्यक्तीचा व आरोपीचा पाठलाग करीत असतांना आरोपीने गुन्ह्यातील पिडीत व्यक्ती नामे तुकाराम पंढरीनाथ मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट येथे डोळ्यावर पट्टी बांधुन सोडुन दिले. त्याठिकाणी पिडीत व्यक्तीस ताब्यात घेवुन,

त्यांच्याकडुन घटनेची अधिक माहिती घेवुन, पाच कोटी रूपयाच्या खंडणीसाठी आरोपी नामे 1) सचिन नारायण वंजारे 2) संतोष नारायण वंजारे दोघे रा. परळी 3) अल्केश विष्णुजी अवजाडे 4) शुभम राजु पिपंळकर दोघे रा. मंगरूळ चावला ता. जि. अमरावती यांनी मिळून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्यापैकी आरोपी नामे संतोष नारायण वंजारे रा. परळी ता. परळी जि.बीड यास गुन्ह्याचे तपास कामी अटक करून त्यांने गुन्ह्याबाबत पुर्ण माहिती सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपास कामी पोस्टे परळी ग्रामिण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

त्यानंतर उर्वरीत आरोपी हे बाहेर राज्यात गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा नागपुर, मध्यप्रदेश, राज्यस्थान व दिल्ली येथे शोध घेतला.

आरोपी नामे 1) सचिन नारायण वंजारे 2) अल्केश विष्णुजी अवजाडे 3) शुभम राजु पिपंळकर दोघे रा. मंगरूळ चावला ता.जि. अमरावती यांना पोस्टे परळी ग्रामिण यांनी अटक केलेली आहे.

गुन्ह्यातील सर्व आरोपी अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे परळी ग्रामिण पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.प्र.पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मँडम, मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड, स्थागुशा, पोनि मझरअली सय्यद पोस्टे परळी ग्रामिण,

पोउपनि सुशांत सुतळे, पोह/मारूती कांबळे, पोह/सचिन सानप, पोह/रामचंद्र केकान, पोह/गोविंद भताने, व पोअ/सचिन आंधळे, पोअ/विकी सुरवसे, पोअ/आसेफ शेख सर्व स्थागुशा यांनी मिळून केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!