कै. बाबुरावजी काळे मराठी स्कूल, सोयगाव येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
विजय चौधरी छत्रपती संभाजीनगर
शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. बाबुरावजी काळे मराठी स्कूल सोयगाव येथील माध्यमिक शाळांत परीक्षा 2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री रंगनाथरावजी काळे व ज्योतीताई रंगनाथरावजी काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक कीर्ती श्याम पाटील द्वितीय क्रमांक प्राची यशवंत पाटील तसेच तृतीय क्रमांक गुंजन कडुबा ठाकरे व वेदिका समाधान पाटील या चारही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी ज्ञानज्योती शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जी यादव संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिरीष पवार व संस्था प्रतिनिधी प्रा.कमलेश काळे तसेच,प्रा. डॉ. दादासाहेब पवार, राजेंद्र जैस्वार, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले.







