
( वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे ) गेवराई दिनांक 27 मे 2025 :बीड पोलीसां कडुण गेवराई येथील गढी अपघाताची अधिकृत प्रेम नोट :– दिनांक 27/दि.२६/०५/२०२५ रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास सोलापुर धुळे हायवे गढी उड्डाण पुलावरून बीड कडुन गेवराई कडे जाणाऱ्या रोडवर आयशर टॅम्पो क्रमांक एम एच.०४ ईएल २३४८ चालक याने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवुन
रोडच्या कडेला उभे असलेले फिर्यादी स्वप्नील भिमराव कोकाटे, वय ३५ वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी, रा. माऊली नगर, गेवगई, जि. बीड व साक्षीदार हेमंत दाभाडे, योगेश शिंदे यांना जोरात धडक देऊन गभीर जखमी केले व १) भागवत गंगाधर परळकर वय ३९ वर्षे रा. संभाजी चौक गेवराई २) मनोज वैजिनाथ करांडे वय ३८ वर्षे रा रांजणी ता गेवराई ३) सचिन रमेश ननवरे वय ३४ वर्षे रा. संजयनगर ना. गेवराई जि.बीड ४) बाळासाहेब ऊर्फ बाळु ज्ञानोबा आतकरे वय ३५ रा. सावतानगर गेवराई 5) दिपक राजपाल सरोया वय ४२ वर्षे रा. गढी ६) कृष्णा गंगाराम जाधव वय ३५ वर्षे ग. संजयनगर गेवराई ता गेवराई जि बीड
यांचे मृत्युस कारणीभूत झाला आहे. घटनेनंतर आयशर चालक याने घटनास्थळावरून पलायन केले आहे.
त्यावरून सदर आयशर चालक याचे विरुद्ध गेवराई पोलीस स्टेशन येथे गुरनं ३४०/२०२५ कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१, बी. एन. एस. सह कलम 134/177 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी चालक याचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मिना हे करीत आहेत.
बीड जिल्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक गढीजवळ भीषण अपघातात सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवारी (दि.२६) रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांच्या माहितीनुसार, आयशर टेम्पोने टोचन करुन नेण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना भरधाव वेगात धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर टेम्पोसह चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कुणीही जखमी झाले नव्हते.
परंतु , डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली.
या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे.
तर एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
अपघाताच्या ठिकाणी अजून एक दुय्यम अपघातही घडला असून त्यातही एकजण जखमी झाला आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








