अखेर जामीन रद्द मुक्काम बालसुधार गृहातः पण हा नंगानाच कोण थांबविणार?

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 23 में 2024 — येथिल कल्याणीनगर हिट अॅड रन प्रकरणात वेगळेच राजकारण आणि दिलेली शिक्षेबाबत जनतेत आक्रोश पाहता पोलीसांनी आपली बाजू सावरत परत कायद्याचे कलमे लाऊन अल्पवयीन मुलास बालकोर्टात उभे केले याचा आता जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे• तसेच त्याला पाच जुन पर्यंत म्हणजे 14 दिवस बालसुधार गृहात ठेवण्यात येणार आहे असा मोठा निर्णय बाल हक्क न्यायालय यांनी दिला •
PM-Kisan शेतक-यांना मिळणारी पीएम किसान पेन्शन बंद होणार ?
अल्पवयीन मुलाचे फरार असलेले पालक विशाल अग्रवाल यांना औरंगाबाद(संभाजी नगर) येथून ताब्यात घेऊन तसेच ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर असे तीघांना कोर्टा समोर हजर केले असता, या आरोपींना 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे• बिघडेल अल्पवयीन मुलगा आणि बिल्डर असलेला त्याचा पालक यांना ही दिलेली शिक्षा कमीच एक युवक आणि युवती या घटनेत जिवाने मारल्या गेले चुक कोणाची रहीसजादे मोकाट सुटले आहे. यांच्या बापाचे बाळावर नियंत्रण राहले नाही• एक रात्रीचे पब चे बिल अल्पवयीन मुलगा 45 हजार खर्च करू शकतो अशाच हॉटेलची क्रेझ पुढे येत आहे•रात्रीच्या मध्यापर्यंत येथे सर्व काही मुबलक मिळते अश्या बिघडेल औलादी किती असतील आणि पैशाच्या जोरावर हे काय काय खरेदी करू शकतील तसेच कोणा कोणाला आडवे करू शकतील यांचा कधीही नंगानाच सुरू असतो•
जगात सर्वात जास्त पगार कोणाला! आणि आहे तर किती ?
पहाटे पर्यंत दारू आणि काखेत युवती तसेच या क्रेझचे कारण आहे पहाटे पर्यंत नंगानाच डिजेच्या ताल हिच आजची संस्कृती बनत चालली आहे•हुक्का पार्लर,पब वर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग मेहरबान असल्याचे दिसते• किती वेळेस कोरेगाव पार्क, मुंढवा, बालेवाडी,बाणेर,हिजवडी,कल्याणी नगर,सुस,वावधन,पिरंगुट,पुणे मुंबई हायवे अशा अनेक ठिकाणी मध्यरात्री पर्यंत कर्णकश आवाजात डिजे चालतो. यात अनेक रूप टॉप हॉटेल,पंचतारांकित हॉटेलचा समावेश आहे विशेष म्हणजे अनेक पंचतारांकित हॉटेल कडून बेकायदा साऊंड सिस्टिम लावत याला पबचे स्वरूप दिले जाते.
आता बारमालकांना भरावा लागेल ५० हजार दंड
•सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश तर दिला जात नाही ऐव्हढेच काय पत्रकारांना सुध्दा येथे भटकू दिले जात नाही. मग प्रवेश देणे वेगळेच• असल्या हॉटेल,पब वर कारवाईतर नामधारी केल्या जाते. मग आठ दिवसानंतर तेच चाळे सुरू होतात• मी पत्रकार क्षेत्रात येण्या पहिले पुष्कळ हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून काम केले आहे बालेवाडीच्या एका पबरूपी बार हॉटेल मध्ये काही दिवस काम केले आहे या हॉटेल मध्ये काय काय होत असते हे मला सर्व माहित आहे कोणा पर्यंत किती आर्थिक देवाण घेवाण होते आणि कशा प्रकारे कॉकटेल चालविले जाते याची कल्पना न केलेली बरी•
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
बालेवाडी, हिजवाडी,पिरंगूट,वावधन, बाणेर,हायवे हे उपनगर सुध्दा ढेपाळले
सांस्कृतिक शहरात पब संस्कृतीचे पेव फुटले आहे• बालेवाडी,बाणेर,सुस, म्हाळुंगे, पिरंगूट ,बावधन, मुढवा चतुःश्रृंगी सह उच्चभू असलेल्या भागात या हॉटेलची चलती आहे• अनेक ठिकाणी बेकायदेशिर रित्या हूक्का पुरविला जातो यांच्यावर मेहरबान कोण आणि कोणाचा आश्रय मिळतो हे सर्वांना माहित आहे•
बॅंकेतील एफडी खोट्या! बॅंकेतील एफडी निघाल्या बोगस ! तुम्ही पण एफडी केलीयं का ?? video
घटना मोठी घडली की कडक धोरणाचा अवलंब करण्यात येतो मग या पुर्वी कायम स्वरूपी धोरण, कडक कारवाई अवलंबण्यात येत नाही कारण यात यांचे सुध्दा हित गुंतलेले असते•असल्या मूरदाड धोरणाने सायंकाळी सहाच्या नंतर बाणेर,बालेवाडी,नळस्टॉप,कर्वनगर,कोथरूड येथे बिनधास्तपणे हॉटेल सुरू राहतात तर जागोजागी रोडवर हातगाड्या लागलेल्या असतात• जंगली महाराजरोडची बोळातील खाऊ गल्ली सकाळ सात पासून रात्री पर्यंत सुरू असते याचा त्रास स्थानिकांना होत असले तरी शेवटी राजकारण येथे आडवे येते•
असला प्रकार सर्व उपनगरात सुरू आहे बाणेर,बालेवाडी,पिरंगूट,पुणे मुंबई हायवे याची नाईटलाइफ जोरात सुरू आहे येथे मध्य रात्री पर्यंत गोंधळ सुरू असतो या भागात अनेक पब,बार, हॉटेल आहेत या ठिकाणी रोडवरच गाडी पार्क केल्या जातात • बालेवाडीत फेज वन,टू,थ्री हा विभाग युवक~ युवतींचा अड्डाच बनले आहे जवळच पोलीस चौकी असूनही कोणी कोणाला जुमानत नाही •
बाणेर,बालेवाडी पोलीस चौकीचे पोलीस निरिक्षक बाबासाहेब झरेकर सांगतात सर्व काही अलबेल आहे वेळेवरच पब,बार,हॉटेल बंद केल्या जातात हे आता होत असले तरी तुमच्या चौकी जवळच यांच्या हद्दीत रोडवर पदपथावर टूव्हिलर,फोरव्हिलर पार्क कशा केल्या जातात तसेच तरूणाईचा गोंधळ रोडवरच का सुरू असतो बालेवाडी गल्ली बोळात असलेल्या पब,बार,हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात आवाजाचे साऊंड सिस्टीम कसे सुरूअसतात•
संगीताच्या तालावर कोरा कॉकटेल बार अॅड किचन या तालावर युवक , युवती थीरकत राहतात• आजकाल या पब मध्ये कोणकोणता कॉकटेल बनविल्या जाईल आणि काय मिसळल्या जाईल याची कल्पना न केलेली बरी, नशा येण्यासाठी आणि देण्यासाठी पब वाले काय काय टाकतील आणि फ्लेवर बनवतील हे या ठिकाणी सांगणेच योग्य ठरणार नाही •
दरम्यान या उपनगरात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे का दुर्लक्ष करतो आहे हे देखील सगळ्यांना माहित आहे• अल्पवयीन झिंगाट होतात एक्साईज मात्र झोपा काढतात• पब मधील यांची प्रवेश प्रक्रीया फार अजब आहे पीआरच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो•
उपनगरात काही पब अडोशात दुर अंतरावर सुरू आहे अनेक मुलामुलींना दारू पासून ते फ्लेवर्ड हुक्का नावाने हुक्का मोठ्या प्रमाणात पुरविल्या जातो •उपनगरातील बालेवाडीच्या काही अंतरातील अडोशातील पब मध्ये दिडशे मुली ग्राहकांना सर्वीस देण्यासाठी रात्री या पब मध्ये आणल्या जातात• राज्य उत्पादन शुल्क अजूनही झोपेत असल्याचे स्पष्ट होत आहे• एवढ्या मोठ्या प्रमाणात खुलेआम नियमाचे आणि कायद्याचे उल्लंघन राजेरोसपणे पब मध्ये होते पोलीस विभाग सुध्दा झोपा काढत आहे•
यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असेल तर जनतेने काय प्रतिक्रिया द्यावी• बालेवाडीचा विभाग घेतला तर एक महिन्यात दोन कोटीचा आर्थिक व्यवहार होत असल्याचे येथिल रहिवाशी व्यक्त करतात• बालेवाडी पबचा सुरू असलेला नंगा नाच आणि याचा होणारा रहिवाशी यांना त्रास त्याच प्रमाणे युवक युवतींची बिघडलेली संस्कृतीचा बंदोबंस्त करण्याची मागणी चतुःसिंगी पोलीस स्टेशनला येथिल युवा नेते लहूजी बालवडकर यांनी एक निवेदन दिले आहे पबचा हा चालणारा कारभार बंद करण्याची मागणी यांनी केली आहे•
