पुणे

छत्रपती संभाजीनगर शहरातून नागपूर आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू.

आता संभाजीनगरमधून दोन तासात गाठता येणार गोवा, सुरू झालंय थेट विमानविजय चौधरी-छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते. त्यासोबतच शहरात आता मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण वाढत चालले आहे. हीच बाब लक्षात घेऊन संभाजीनगर हवाई मार्गाने इतर शहरांशी जोडलं जात आहे. आता मराठवाड्यातून पर्यटकांना थेट विमानानं गोव्याला जाता येणार आहे. संभाजीनगर शहरातून नागपूर आणि गोव्यासाठी विमानसेवा झाली आहे. 2 जुलैपासून इंडिगोची ही विमानसेवा सुरू होणार असून अवघ्या दोन तासात गोव्याला पोहोचता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर ते गोव्यासाठी इंडिगो या विमान कंपनीने विमानसेवा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर ते गोवा असा हा हवाई मार्ग असणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते गोवा 632 किमी अंतर पार करण्यासाठी रस्ते मार्गाने 15 तासांचा कालवधी लागतो. परंतु, आता हे अंतर हवाई मार्गे फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे.

 

छत्रपती संभाजीनगर ते गोवा ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी ही सेवा राहणार आहे. या विमानसेवेमुळे आता लखनऊला देखील संभाजीनगरपासून हवाई कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ही विमानसेवा लखनऊवरून गोव्यापर्यंत असेल. गोव्यावरून हे विमान छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुढे लखनऊला जाईल.

कसं आहे वेळापत्रक?

इंडिगो विमान कंपनीचे विमान नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी निघेल. ते संभाजीनगरला 11 वाजता उतरेल. संभाजीनगरहून हे विमान परत गोव्यासाठी जाणार आहे. त्यासाठी सकाळी साडेअकरा वाजता हे विमान उड्डाण घेईल आणि गोव्याला एक वाजून 30 मिनिटांनी उतरेल. गोव्यातून हे विमान छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी उतरेल. पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरला जाण्यासाठी विमान 4 वाजून 40 मिनिटांनी निघेल आणि नागपूरला 6 वाजून 10 मिनिटांनी उतरेल. इंडिगोच्या विमानाचा अशा प्रकारे पूर्ण प्रवास असणार आहे.

मराठवाड्याच्या पर्यटनास होईल फायदा

छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे. या ठिकाणाहून नागपूर गोव्यासाठी विमानसेवा असावी अशी पर्यटकांची मागणी होती. यासाठी आपण पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून नागपूर गोवा विमानसेवेचा मराठवाड्याच्या पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक शरद येवले यांनी सांगितले.

आता संभाजीनगरमधून दोन तासात गाठता येणार गोवा, सुरू झालंय थेट विमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!