गिरडाघाट दरोडा प्रकरण प्रकरणी फर्दापूर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने काही तासातच सहा आरोपींना अटक

वेगवान मराठी/विजय चौधरी
छत्रपती संभाजीनगर दि.१२/सोयगाव तालुक्यातील पिंपळवाडी येथूनच जवळच असलेल्या गिरडा घाटात ता.१० जून रात्री दहा वाजेच्या सुमारास धनिक मायक्रो फायनासच्या तीन वसुली कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करून त्यांच्या कडील दीड लाख रुपये लुटल्याची घटना फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या महादेव मंदिराजवळ घडली होती दरोडेखोरांच्या मारहाणीत धनिका मायक्रो फायनास धीरज शांतम हा गंभीर जखमी झाला होता तर पैसाची बॅग पंजाब थीगले व सदानंद इंगळे यांच्याबजवळून हिसकावून घेऊन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले या संबंधी फर्दापूर पोलिसात संबंधितांनी फिर्याद दिली असता फर्दापूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाची चक्रे गतिमान करून काही तासातच यातील सहा दरोडेखोरांना अटक केली आहे संजय प्रभाकर खांडेकर (वय २२),मुकेश संजय पवार (वय २१) किरण अरुण सपकाळ (वय २५),अक्षय उर्फ अमोल प्रभाकर जाधव (वय २९), भरत बन्सीलाल चव्हाण (वय २५),शुभम बाळू सुरडकर (वय २२) यातील काही रा.गोतमारा,ता.जि. बुलढाणा तर काही आरोपी सोयगाव तालुक्यातील देव्हारी व टिटवी येथील आहेत
ही कारवाही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक प्रफुल साबळे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पो हेड कॉ. मिरखा तडवी,पो.कॉ.भरत कोळी,आनंद पगारे,योगेश खडके तर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थोटे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव पो.हे कॉ. नरेंद्र खंदारे,,पो कॉ श्रीमंत भालेराव, पो.ना.विजय धुमाळ यांनी केली
