जरंडी मंडळात अतिवृष्टी;- ७० मिनिटांत ६७ मी मी पाऊस
शेतात शेडवर गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून रात्री साडे अकरा वाजता जागीच मृत्यू

विजय चौधरी वेगवान मराठी
सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळात रविवारी रात्री साडे अकरा वाजता तुफान पावसाने सुरुवात केली तब्बल ७० मिनिटांचा या मुसळधार पावसाने जरंडी मंडळात ६७ मी मी पाऊस झाला असून घोसला शिवारात गट क्र-७४ मधील शेतात शेडवर गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून रात्री साडे अकरा वाजता जागीच मृत्यू झाला आहे
युवराज पूना गव्हांडे(वय ५५) असे वीज कोसळून ठार झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव असून घोसला शिवारातील गट क्र-७४ मध्ये रात्री नऊ वाजता जेवण करून शेड मध्ये झोपायला गेले असता रात्री झालेल्या विजांच्या कडकडाट व मुसळधार पावसाने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे महसूल ने घटनास्थळी पंचनामा केला आहे
गोंदेगाव सह बनोटी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सर्व नद्या रात्री तीन वाजेपर्यंत दुथडी भरून वाहत होत्या दरम्यान जरंडी मंडळातील १८ गावांना या अतिवृष्टी च्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे घोसला शिवारातील पिके पाण्यात वाहून गेली आहे कपाशी सह मका सोयाबीन ज्वारी बाजरीआदी पिकांची नुकसान झाले आहे जरंडी मंडळात १८ गावे बाधित झाली आहे दरम्यान महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पिकांच्या नुकसानी ची पाहणी करण्याचे आदेश दिले असून तलाठी कृषी सहायक यांना दोन दिवसात नुकसानी चा अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी दिले आहे सायंकाळी उशिरा जरंडी गावातील नुकसानी च्या पाहणी साठी तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड आदींनी जरंडी शिवारात नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी कृषी मंडळ अधिकारी रमेश गुंडीले कृषी पर्यवेक्षक समाधान चौधरी शेतकरी राजू पाटील,प्रदीप पाटील समाधान पाटील दिलीप पाटील आदी उपस्थित होते
